मागेल त्याला सौर कृषी पंप योजना - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची ठळक वैशिष्टे :-

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana



◆ शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच.

◆ अनुसूचित जाती - जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के

◆ उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान

जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा.


  Magel Tyala Saur Krushi Pump Yojana लाभार्थी निवडीचे निकष:-

 ● २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.

● वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.

● ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पध्दत आहे ?

या योजने अंतर्गत नवीन सौर कृषीपंप मिळण्याकरीता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवरुन किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या link वर जाऊन, अर्जदारास अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाचे आहे.


मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजने अंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ?

1) शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे), 

2) आधारकार्ड, 

3) जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे.    4) अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. 

5) पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.


अर्जदार शेतक-यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे?

एखाद्दा अर्जदार शेतक-यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कायार्लयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.


अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल ?

लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्य:स्थितीची माहिती अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकच्या आधारे अर्जाची सध्यस्थिती बघता येईल.



         www.newsclub24.in











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.