अहिल्यादेवी मेंढी व शेळी योजना - Scheme for Dhangars and similar tribes
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता योजना Scheme for Dhangars and similar tribes
मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्हातील भज-क या प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थी खालील योजनेकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक १२/०९/२०२४ ते २६/०९/२०२४ या कालावधी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
१) स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर अशा
मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप. या योजनेअंतर्गत मेंढी गटवाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांसाठी खालील
२,३ व ४ या घटकांचा समावेश
२) सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप.
३) मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
४) मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
५) हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.
६) पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान
मेंढ्यासाठी चराई अनुदान योजना
ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढ्या व १ मेंढानर
एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६,०००/- असे एकूण २४,०००/- चराई अनुदान वाटप.
कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना
चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या
१०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी
कमाल रु. ९०००/- च्या मर्यादित ७५% अनुदान
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना
राज्यातील भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्च बंदिस्त, बंदिस्त मेंढी शेळी पालनाकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान.
अधिक माहिती करिता संपर्क :-
१. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (संबंधित जिल्हा)
२) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, (संबंधित जिल्हा परिषद) ३. पशुधन विकास अधिकारी (विस्तार), संबंधित पंचायत समिती
४. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे.
योजनेकरिता अर्ज (www.mahamesh.org) या संकेतस्थळावर करावा.
आवश्यक कागदपत्र :-
1) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
2) आधार कार्ड
3) रेशन कार्ड
4) बँक पासबुक
5) पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी
यांचेप्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. १ नुसार)
6) अपत्य स्वयंघोषणा पत्र
योजनेसाठी कोण पात्र नाही :-
1) राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील सदस्य या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत.
2) मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यामधील व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
३) १८ वर्षपिक्षा कमी व ६० वर्ष वयापेक्षा जास्त असलेले व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत.
4) एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
Post a Comment