नागराज मंजुळेंबरोबर काम करण्याची संधी
नागराज मंजुळेंबरोबर त्यांचा आगामी चित्रपट खाशाबा मध्ये काम करण्याची संधी.
ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर चित्रपटामध्ये काम करण्याची संधी .
फँड्री, सैराट या चित्रपटांमध्ये नागराज मंजुळे यांनी नवीन कलाकारांना काम करण्याची संधी दिली होती .त्याचप्रमाणे त्यांचा आगामी चित्रपट 'खाशाबा' या चित्रपटासाठी लवकरच ऑडिशन चालू होणार आहेत. अशी माहिती नागराज मंजुळे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती पोस्ट केली आहे.
जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फँड्री पासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल.असे ते म्हणाले आहेत.
तसेच नवीन कलाकारांना संधी देण्यात येणार आहे.
"खाशाबा" चित्रपट ऑडिशन
दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे
फक्त मुलांसाठी
वयोगट - ७ ते २५ वर्षे
मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक
● पाच फोटो (त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे)
३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ.
३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ.
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै
https://www.dyandeepmarathi.com/
Post a Comment