छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते औरंगजेबाची कबर

शिवाजी महाराज स्मारक ते औरंगजेबाची कबर




२४ डिसेंबर २०१६... मुंबईच्या अरबी समुद्रात जलपूजनाचा भव्य सोहळा! देशभरातील लाखो शिवप्रेमींच्या आशा उंचावल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार होते... एक ऐतिहासिक महत्त्वाचा दिवस!


या स्मारकाचे वचन देण्यात आले होते की ते जगातील सर्वांत उंच अशा पुतळ्यांपैकी एक असेल. समुद्राच्या मध्यभागी असलेले हे स्मारक भविष्यात महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक ठरणार होते.

आज त्या जलपूजनाला आठ वर्षे उलटली. पण प्रत्यक्ष स्मारक कुठे आहे? अजूनही काहीच हालचाल नाही. ना कोनशिला उभी राहिली, ना पुतळ्याचा आकार स्पष्ट झाला!

राजकीय घोषणांमध्ये शिवरायांचे नाव सतत पुढे येते, पण प्रत्यक्ष कृती कुठे आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात शिवरायांच्या स्मारकाची चर्चा फक्त निवडणुकीपुरती असते. असो

आता राजकीय घोषणांमध्ये चर्चेचा विषय आहे औरंगजेबाची कबर ! शिवरायांचे स्मारक जिथे रखडले, आता औरंगजेबाची कबर काढण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. याला राजकीय खेळी म्हणायचं का?



खरंच... औरंगजेबाची कबर काढून आपल्या समस्या सुटतील का? आज बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणातील तफावत, आर्थिक स्थैर्य हे महत्त्वाचे मुद्दे नाहीत का. पण त्यावर बोलणार कोण ? आज राजकारण फक्त जनभावना भडकवण्यासाठी केले जात आहे, प्रत्यक्ष विकासासाठी नाही.

छ शिवाजी महाराजांसह महापुरूषांच्या अपमानावरुनही मोठा वादंग होताना तुम्ही आम्ही पाहिलाय.
आज एक प्रश्न स्वत:ला विचारुन पहा , आजच्या घडीला वाढती गुन्हेगारी, खंडणीखोरांची दहशत, दिवसाढवळया होणाऱ्या हत्या, आया बायांची लुटली जाणारी इज्ज्त, त्यातून होणारे अमानवीय खुन, शेतकऱ्यांनी घेतलेले टोकाचे निर्णय , वाढती बेरोजगारी, तरुणाईच्या हाताला नसलेला रोजगार, दुष्काळ, शेतीपीकांना मिळत नसलेला योग्य हमीभाव आणि त्यातून शेतकऱ्यांना आलेलं आर्थिक दारिद्रय हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत की, ३०० वर्षापुर्वी ज्याला आपल्याच पुर्वजांनी मातीत गाडला त्या औरंगजेबाच्या कबरीवरुन आपली अन् दुसऱ्यांची घर जाळणं. खरंच औरंगजेबाची कबर आपल्या सगळया मूलभूत प्रश्नांचा इलाज आहे का.
शेती , शेतकरी, पाणी, शिक्षण, रोजगार याची काहीच गरज राहिली नाही. केवळ घोषणांच्या आधारावर महाराष्ट्राचे भवितव्य घडवता येईल का? हया सगळया प्रश्नांची उत्तरे स्वत:ला विचारुन पहा. तसेच जे तुम्हाला भडकवत आहेत त्यांचे पोरे काय करतात ते पहा. आता हया व्हिडिओ मध्ये एवढंच. जय शिवराय! जय महाराष्ट्र

जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली, तर जास्तीत जास्त शेअर करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.