बिनकामाच्या मेल्सने भरलेला G-Mail या 3 टिप्सने मिनिटात खाली करा.

 तुमच्या जीमेलमध्ये सातत्याने जीमेल फुल झाल्याचा मेसेज येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला काही खास टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही बिनकामाचे मेसेज डिलीट करू शकतात.



जीमेल फुल झाल्याची समस्या अनेकदा अनेकांना येत असते. अनेक वेळा आपण या मेल्सकडे दुर्लक्ष करतो. परंतु, गुगल जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोजसाठी फ्री क्लाऊड स्टोरेज उपलब्ध करते. परंतु अनेकदा हे स्टोरेज लवकर संपले जाते. आता लोक स्टोरेज खरेदी करतात. कारण, वारंवार स्टोरेज फुलचा मेसेज दिसू नये यासाठी. परंतु स्टोरेज खरेदी करण्याआधी आपल्याला जीमेल रिकामे करायला हवे. कारण, अनेकदा अशा फाइल्स मेल्स मध्ये पडून असतात. ज्या काही कामाच्या नसतात. त्यामुळे त्या फक्त जीमेल भरण्याचे काम करतात. यात सर्वात जास्त स्पॅम आणि अनवॉण्टेड मेल्स असतात. या ठिकाणी मेल्सला डिलीट करण्याची पद्धत सांगत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.


स्पॅम किंवा अनवॉण्टेड ईमेलला कसे कराल डिलीट -



• आपल्या पीसी किंवा मोबाइल डिव्हाइसवर कोणत्याही ब्राऊजरमध्ये जाऊन जीमेल ओपन करा. • आता त्या इनबॉक्स, सोशल, स्पॅम फोल्डर किंवा फोल्डरमध्ये जे ईमेल तुम्हाला डिलीट करायचे आहे. • वर दिसत असलेल्या तीन लाइन्सवर क्लिक करा. • त्या मेसेजला सिलेक्ट करा ज्यांना तुम्हाला डिलीट करायचे आहे. नंतर पुन्हा डिलीटवर क्लिक करा. डिलीट झाल्यानंतर मेल्स ट्रॅशमध्ये जाते. ट्रॅशमधूनही याला डिलीट करा. अनरीड मेसेजला डिलीट करा


ब्राऊजरमध्ये जीमेल ओपन करा. • कॅटेगरीत label:unread किंवा label read लिहून एंटर दाबा. • जीमेल सर्व अनरीड किंवा रीड मेल्सला तुमच्या डिस्प्लेवर दिसेल. • पुन्हा सिलेक्ट ऑल बॉक्स वर क्लिक करा. यानंतर Select all conversations that match this search वर टॅप करा. यानंतर डिलीटच्या आयकॉनवर टॅप करा.


मोठ्या फाइल्स हटवण्याच्या सोप्या टिप्स -



सर्च बॉक्स मध्ये टाइप करा.


has : attachment larger: 10M साइज आपल्या

हिशोबानुसार टाकू शकतात. 

• सर्चवर क्लिक करा. नंतर त्या मेल्सला सिलेक्ट करा. ज्यांना तुम्हाला डिलीट करायचे आहे. नंतर डिलीटवर टॅप करा. 

पेजच्या लेफ्ट साइड मेन्यवर क्लिक करा. ट्रॅशवर क्लिक करा 

• यानंतर Empty trash now वर क्लीक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.