नृत्य प्रकार प्रश्न || TCS IBPS QUESTION
नृत्य प्रकार अत्यंत महत्त्वाचे प्रश्न :
या लेखामध्ये मध्ये म्हाडा, SSC, ITI , NTPC , POLICE या सर्व प्रश्न पत्रिकाचा अभ्यास करुन आगामी काळात होणाऱ्या तलाठी , वनरक्षक, Z.P. महानगरपालिका, पोलीस भरती या सर्व परिक्षा साठी उपयुक्त असे महत्त्वाचे नृत्य प्रकारा वरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत .
भारतीय नृत्य प्रकारावर अनेक स्पर्धा परिक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात .
ह्या सर्व प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
1) केलुचरण मोहपात्र ...........च्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे.
- ओडिसी
2) रुक्मिणी देवी अरंडेल कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात.
- भरतनाट्यम
3) नंदीकोलु हे कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे.
- कर्नाटक
4 ) कोणते नृत्य भारतातील इतर नृत्याची जननी म्हणून ओळखले जाते.
- भरतनाट्यम
5) सत्रिया नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला.
- आसाम
6 ) गुरुवेंपती चिन्ना सत्यम हे कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते.
- कुचीपुडी
7) पद्मा सुब्रमण्यम हे नाव कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.
- भरतनाट्यम
8) कोणत्या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरामध्ये झालेला आहे.
- मोहिनीअट्टम
9) राठवानी घेर हे........... येथील आदिवासी नृत्य आहे.
- गुजरात
10) लाऊल लोकसंगीत कोणत्या राज्यातील आहे.
- पश्चिम बंगाल
11) कोणता शास्त्रीय नृत्यप्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे.
- सत्तरीय
12) पद्मश्री शोवना नारायण हे कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत.
- कथ्थक
13) गरबा हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.
- गुजरात
14) कथकली हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे.
- केरळ
15) टापू नृत्य कोणत्या राज्यातील आदिवासी नृत्य आहे।
- अरुणाचल प्रदेश
16) हम्पी नृत्य उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
- कर्नाटक
17) मल्लापुरम नृत्य उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
- तामिळनाडू
18) शिकार मोहिमेची तयारी म्हणून नागालँड मधील कोणता नृत्य प्रकार ओळखला जातो.
- सदल केकई
19) पंथी नृत्य कोणत्या राज्याची संबंधित आहे.
- छत्तीसगड
20) लूर नावाचे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- हरियाणा
21) पोवाडा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- महाराष्ट्र
22) कोणते नृत्य हिमाचल प्रदेशात लोकप्रिय आहे.
- नाटी
23) झिझिया नृत्यप्रकार कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे.
- बिहार
24) महाराष्ट्राच्या पारंपारिक लोकरंगभूमीचे नाव काय आहे.
- तमाशा
25) पूर्व आंध्र प्रदेशचे शास्त्रीय नृत्य कोणते.
- कुचीपुडी
26) यक्षगान कोणत्या राज्यातील लोकप्रदर्शन आहे .
- कर्नाटक
27) महिलांचे ढालो लोकप्रिय लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे .
- गोवा
28) उत्तर प्रदेशच्या कुमाऊ भागात लोकप्रिय तलवार नृत्याला काय म्हणतात.
- चोलिया
29) हुर्कीया बाऊल भारताच्या कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे.
- उत्तराखंड
30) बार्डो चाम हे लोकनृत्य कोणाचे आहे.
- अरुणाचल प्रदेश
31) कोणत्या राज्यात लाकडी मुखवटे वापरून नृत्य केले जाते.
- पश्चिम बंगाल
32) घूमर हे लोकगीत आणि लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
- राजस्थान
33) दुमहल नृत्यप्रकार कोणत्या भारतीय राज्यातील /केंद्रशासित प्रदेशातील लोकनृत्य आहे.
- जम्मू काश्मीर
34) मणिपुरी शास्त्रीय नृत्य प्रकार कोणाच्या जीवनातील नृत्य दाखवतात.
- कृष्ण
35) कोणत्या राज्यात माथुरी लोकनृत्य प्रसिद्ध आहे.
- तेलगंणा
36) कोणते केरळचे पारंपारिक नाट्यगृह आहे जेथे आठ दिवसात आठ नाट्य सादर केले जातात.
- कृष्णनट्टम
37) सांस्कृतिक मंत्रालयाच्या मते, भारतात शास्त्रीय नृत्याचे किती प्रकार आहेत.
- 9
38) कोणते शास्त्रीय नृत्य मुगल परंपरेने प्रभावाने प्रचलित असलेले शास्त्रीय नृत्य आहे.
- कथ्थक
39) कोणते राज्य पाईको नृत्याशी संबंधित आहे.
- ओडिशा
40) भारतीय नृत्य प्रकार मणिपुरी हा मुख्यता कोणत्या विषयावर आधारित आहे .
- कृष्ण - गोपी
41) मायकल जॅक्सनच्या 1991 च्या हिट ' सिंगल ब्लॅक आणि व्हाईट ' या संगीत व्हिडिओ मध्ये कोणते एकमेव भारतीय नृत्य होते.
- ओडिसी
42) सिक्कीम चे लोक त्यांच्या अप्रतिम मुखवटा नृत्य प्रकारासाठी ओळखले जातात . या नृत्य प्रकाराला सिक्कीमचे लोक काय संबोधतात.
- छाम
43) छरही या नृत्य प्रकाराची उत्पत्ती कोणत्या राज्यात झाली आहे.
- हिमालय प्रदेश
44) कोणत्या दक्षिण भारतीय नृत्याचा शब्दशः अर्थ कथा आणि नाटक असा आहे.
- कथ्थकली
45) चोलिया नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- उत्तराखंड
46) पंडित बिरजू महाराज हे नाव कोणत्या शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध आहे.
- कथ्थक
47) बांळू नृत्य म्हणून प्रसिद्ध असलेले चेरव हे कोणत्या राज्याचे सांस्कृतिक पारंपारिक नृत्य आहे.
- मिझोराम
48) कालबेलिया लोकगीते आणि नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत.
- मिझोराम
49) कोणत्या राज्यात धनकुल लोकगीत खूप प्रचलित आहे.
- आसाम
50) कोणत्या क्षेत्रासाठी श्री परशुराम आत्माराम गंगावणे यांना 2021 च्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
- चित्रकथी या पारंपारिक लोककले साठी
51) छाऊ हे नृत्य कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे.
- पश्चिम बंगाल - पुरुलिया छाऊ
झारखंड - सेरा किल्ला छाऊ
ओडीसा - मयूरभंज छाऊ
52) तामिळनाडू या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य प्रकार कोणते आहेत.
- भरतनाट्यम, करग्म, कुरवंजी, कुम्मी, कवाडी, कोलाट्टम
53) उत्तर प्रदेश या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य प्रकार कोणते आहेत.
- कथ्थक, रासलीला, झोरा, जैता
54) कागिद नृत्य कोणाशी संबंधित आहे.
- बौद्धांशी
55) महाराष्ट्र या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य प्रकार कोणते आहेत.
- लावणी ,लेझीम ,कोळी नृत्य ,बाल्या नृत्य ,पावरी ,दशावतार
56) कोणत्या नृत्यासाठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे.
- भरतनाट्यम
57) लमन हे लोकनृत्य लोक संगीत कोणत्या राज्यात आढळते.
- हिमालय प्रदेश
58) मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- केरळ
59) ढोला मारु हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- राजस्थान
60) डोलु कुनिथा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- कर्नाटक
61) भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार .
- लोला सॅमसन, मृणालिनी साराभाई, बैजंयतीमाला बाली, यामीनी कृष्णमुर्ती, रुक्मीनीदेवी अरुंदले, मालविका सरकार.
62) नागा डान्स हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- आसाम
63) जाट जटीन हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- बिहार
64) राउत ( Raut ) हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- छत्तीसगड
65) भवाई हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- गुजरात
66) फुगडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- गोवा
67) हरियाणा या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य कोणते आहे.
- लूर नृत्य
68) राउफ नृत्यप्रकार कोणत्या भारतीय राज्यातील /केंद्रशासित प्रदेशातील लोकनृत्य आहे.
- जम्मू काश्मीर
69) कठपुतली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- राजस्थान
70) कथ्थकली या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार .
- उदय शंकर, कलामंडलम गोपी, व्ही. के. नारायण मेनन, पद्मनाभन कुमारनायर.
71) कथ्थक या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार .
- पंडित बिरजू महाराज, दमयंती जोशी, सितारा देवी, पं. फिर्तु महाराज, लच्छु महाराज, पं. कार्तिक राम, पं. कल्याणदास महंत.
72) मणिपुरी या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार कोण आहेत.
- गुरु बिपीन सिंह, नल कुमार सिंह, सविता मेहता, कलावती देवी
73) मोहीनी अट्टम या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार कोण आहेत.
- कल्याणी अम्मा ,गीता गायक, श्री. देवी, रागिनी देवी , हेमा मालिनी , सुनंदा नायर , गोपीका वर्मा.
74) ओडिसी या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार कोण आहेत.
- मोहन महापात्रा, पंकज चरण दास, मायाधर रावत, सोनालमान सिंह, कालीचरण पटनायक
75) मयुरभंज छऊ हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
- ओडीशा
Post a Comment