नवीन वाळु धोरण। new sand policy
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन वाळू धोरण :
पूर्वी सहा ते सात हजार रुपये प्रति ब्रास मिळणारी वाळू आता 600 प्रती ब्रास मिळणार असल्याची घोषणा राज्यसरकारने नुकतीच केली. पूर्वी अनेक जिल्ह्यात वाळू घाट सुरू असत पण यामधून अनेक तस्करीच्या घटना समोर आल्यामुळे शासनाने या गोष्टीला आळा बसण्यासाठी नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. तसेच बऱ्याच वाळू घाट मध्ये लिलाव बंद असल्यामुळे वाळू टंचाई मोठ्या प्रमाणात भासत होती त्यामुळे वाळू चढ्या दराने घेऊन बांधकाम पूर्ण करावे लागत असे.
परिणामी घरांचे कामे करताना विलंब लागत असून घर खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत होता.
त्यामुळे शासनाने नवीन वाळू धरण जाहीर केले आहे.
नवीन वाळू धरण कसे आहे ?
नवीन वाळू धोरणानुसार वाळु लिलाव पूर्णपणे बंद होणार आसुन नागरिकांना आता वाळू सरकारी डेपोमध्ये मिळणार आहे. 600 रु. इतक्या किमतीला वाळूची विक्री केली जाणार आहे. तसेच वाहतुकीचा खर्च ग्राहकांना करावा लागणार आहे.
नवीन वाळू धोरणानुसार एका कुटुंबाला 10 ब्रास वाळू मिळणार आहे.New sand policy
वाळु कशी मिळणार?
त्यासाठी ग्राहकांना महाखनीच या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे तसेच ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नसेल त्यांनी सेतू कार्यालयामार्फत मागणी नोंद करावी.
सर्वप्रथम आपणास mahakhanij.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
यानंतर महाखनिजची वेबसाईटचे होम पेज आपल्या समोर ओपन होईल.
इथे आपणास मराठी किंवा इंग्रजी या दोघांपैकी एक भाषा निवडुन घ्यायची आहे.
अर्ज ह्या पर्यायावर क्लिक केल्यावर आपणास दोन पर्याय दिसुन येतील.आंतराज्जीय खनिज परिवहन अणि तात्पुरता प्रस्ताव.
यापैकी एका पर्यायाला निवडुन झाल्यावर आलेल्या सुचना वाचुन साईन इन करायचे आहे.
युझर नेम पासवर्ड जवळ असल्यास डायरेक्ट लाॅग इन करायचे आहे नसेल तर आपणास नवीन अकाऊंट ओपन करायला साईन अप करून घ्यायचे आहे.
युझर नेम पासवर्ड जवळ उपलब्ध नसल्यास साईन अप ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आपले नाव अणि मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीत इंटर करायचा आहे.यानंतर मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठविला जाईल तो इथे इंटर करायचा आहे.अणि खाली दिलेल्या सबमीट बटणावर ओके करायचे आहे.
यानंतर सेट पासवर्ड मध्ये आपला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे अणि खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.याऩंतर आपल्या मोबाईल वर एक युझर नेम पाठविला जाईल तो युझर नेम पासवर्ड अणि खाली दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा भरून लाॅग इन करायचे आहे.
यानंतर आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल स्क्रीनवर डाव्या बाजूला असलेल्या online application ह्या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर विविध पर्याय येतील दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडुन आपला अर्ज सादर करायचा आहे.
यात आपणास अर्जदाराचे नाव ईमेल आयडी पत्ता मोबाईल नंबर जिल्हा राष्ट्रीयत्व इत्यादी माहिती भरावी लागणार आहे.
Post a Comment