महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व विद्यावेतन

 महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व विद्यावेतन :

mahajyoti online link



महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर मार्फत राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 2023 साठी अर्ज करून मोफत प्रशिक्षण मिळवा.


महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.


योजनेचे स्वरुप :-


पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते..


प्रशिक्षणाचा कालावधी :- 4 महिनेकरिता +

विद्यावेतन  :- रु.6000/- प्रती उमेदवार ( ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता)


प्रशिक्षण ठिकाण :-      प्रशिक्षणार्थी  संख्या।

 1) नागपूर                           300         


 2) छत्रपतीसंभाजी नगर        300

                    



  पात्रता:


1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.

2. विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.

3. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी

4. विद्यार्थी हा 12 वी उत्तीर्ण असावा/ असावी.

5. वय मर्यादा : 18 ते 25


शारिरीक क्षमता : 

विद्यार्थी प्रशिक्षणाकरिता पात्र झाल्यास खालील बाबींची पुर्तता करण्यात यावी अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही


उंची :- कमीत कमी 165 से.मी (पुरुष) कमीत कमी 155 से.मी (महिला)


छाती :- कमीत कमी 79 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 से.मी) केवळ पुरुषांकरिता




अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:


1. आधार कार्ड

2. रहिवासी दाखला

3. जातीचा प्रमाणपत्र

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

5. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

6. बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक)


अर्ज कसा करावा.


1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल नंबर टाकून verify करा.

 Notice Board मधील पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 

2. अर्जासोबत 'ब' मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.


 आरक्षण:-


1. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागाम महिलांसाठी आरक्षित आहे.


2. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.






प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :


1. अर्ज करण्याचा अंतिम दि.27/08/2023 आहे.


2. विहित नमुन्यामध्ये कागदपत्रासहित अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.


3. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या उमेदवारांनाच विद्यावेतन देण्यात येईल.


4. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते देणे अनिवार्य आहे.


5. महाज्योतीकडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारथी, पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महाज्योती कडील सदर प्रशिक्षणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेत अधिछात्रवृत्तीचा लाभ धारक नसावा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्याविरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.


6. सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांने वरील अटी व शर्तीचा भंग केल्याचे तसेच चुकीची किंवा खोटी कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास त्यांचेवर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांचेकडुन वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असणार नाही.


7. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्याचा अर्ज बाद करण्यात येईल.


8. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील. 

पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा :

07122870120/21


अर्ज कसा करावा step by step माहिती खालील लिंक वर अपलोड केली आहे.

@primetimemarathi 



ही माहिती गरजु विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.