Sbi Job Vacancy 2024





Sbi Job Vacancy 2024 : PDF

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मंगळवारी अधिकृतपणे त्यांच्या लिपिक भरती 2024 साठी अधिसूचना जारी केली, लिपिक संवर्गातील 13,735 कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

इच्छुक उमेदवार 17 डिसेंबर 2024 पासून SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज विंडो 7 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहील.

ऑनलाइन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणे हे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

SBI Clerk Recruitment 2024: अर्ज करण्याची तारीख

अर्ज भरण्यासाठी सुरुवात - 17 दिसंबर 2024
अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 7 जनवरी 2025
प्रिलियम परीक्षा तारीख- अंदाजे फरवरी 2025 
मुख्य परीक्षेची तारीख- अंदाजे मार्च/अप्रैल 2025 

SBI Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता काय

एसबीआयमधील या पदांसाठी उमेदवारांकडे कुठल्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इंटीग्रेटेड डूअल डिग्री (आईडीडी) सर्टिफिकेट वाल्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 च्या अगोदर आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 च्या अगोदर आणि 1 एप्रिल 2004 च्या नंतर झालेला नसावा. 

अर्जासाठीचे शुल्क किती 

या क्लर्क पदासाठी सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना परीक्षा शुल्क 750 रुपये भरावे लागणार आहे. तर, एससी/एसटी/पीडब्ल्यू/एक्सएस/डीएक्सएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना शुल्कात सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना शुल् भरताना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगचा वापर करावा लागेल. 

माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्या

दरम्यान, अधिक माहितीसाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन भेट देऊ शकतात. 

निवड प्रक्रिया - सर्व प्रथम ऑनलाइन प्राथमिक परीक्षा होईल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना स्थानिक भाषेची चाचणी द्यावी लागेल. स्थानिक भाषेची चाचणी अर्ज भरताना निवडलेल्या स्थानिक भाषेत घेतली जाईल.

प्राथमिक परीक्षा कशी असणार?
ही परीक्षा १ तासाची असेल ज्यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता यासंबंधी एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. प्राथमिक परीक्षेसाठी १०० गुण निर्धारित केले जातील. इंग्रजी विभागासाठी ३० गुण आणि संख्यात्मक आणि तर्कशास्त्रासाठी प्रत्येकी ३५ गुण असतील. संपूर्ण परीक्षेसाठी, उमेदवाराला एक तास आणि एका विभागाचे प्रश्न सुमारे २० मिनिटांत सोडवावे लागतील. प्राथमिक परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापले जातील.

कुठे किती जागा रिक्त आहेत?

उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) तुम्हाला चांगले ज्ञान असले पाहिजे. मध्य प्रदेशसाठी १३१७, छत्तीसगडसाठी ४८३, चंदीगडसाठी ३२, दिल्लीसाठी ३४३, जम्मू आणि काश्मीरसाठी १४१, हिमाचलसाठी १७०, पंजाबसाठी ५६९, राजस्थानसाठी ४४५, उत्तर प्रदेशसाठी १८९४, उत्तराखंडसाठी ३१६, बिहारसाठी ११११, गुजरातसाठी १०७३, झारखंडसाठी ६७६, महाराष्ट्रासाठी ११६३

PDF

अधिक माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.